निर्यातीला जाणारी केळी: शेतावर काय लागते
तुमच्या शेतातून निघालेली केळी बंद कंटेनरमध्ये आखाती देशांपर्यंत जाते. वाटेत काही सुधारता येत नाही. म्हणून शेतावरच काय काळजी घ्यायची, ते इथे सोप्या भाषेत दिले आहे.
आम्ही कोण
FTM Export Import Private Limited ही पुणे येथील नोंदणीकृत निर्यातदार कंपनी आहे. आमची स्वतःची शेती नाही. आम्ही सोलापूर भागातील शेतकऱ्यांकडून केळी घेतो आणि ती आखाती देशांतील खरेदीदारांना पाठवतो. आमची APEDA नोंदणी आहे.
जात: कॅव्हेंडिश G9 (ग्रँड नैन)
शेतावर काय लागते
पाच गोष्टी. प्रत्येक शिपमेंटची नेमकी माहिती आम्ही तुम्हाला आधी सांगतो.
-
तोड ठरलेल्या तारखेला नाही, ठरलेल्या परिपक्वतेला
प्रत्येक शिपमेंटला किती परिपक्व केळी लागते ते वेगळे असते. ती वेळ आम्ही तुम्हाला आधी सांगतो. तोडण्यापूर्वी शंका असेल तर आधी विचारा.
-
निवड: चालणार नाही ते आधीच बाजूला
पेटीत भरायच्या आधीच खराब, डागाळलेली आणि खरचटलेली फळे वेगळी काढा. एकदा पेटी बंद झाली की ती दुसऱ्या टोकाला उघडते.
-
प्रतवारी: फण्यांच्या संख्येनुसार
पेटीमागे 4, 5, 6, 7, 8 फण्या किंवा क्लस्टर, त्या शिपमेंटला जे ठरले असेल त्याप्रमाणे. एका पेटीत वेगवेगळी प्रतवारी मिसळू नका.
-
पेटी: हवा खेळती राहणारी निर्यात पेटी
आतमध्ये पॉली लायनर आणि इथिलीन शोषक असतो. वजन साधारण 13.5 किलो, किंवा त्या शिपमेंटसाठी जे वजन सांगितले असेल ते.
-
हाताळणी: आपटू नका, घासू नका
केळीवर पडलेला मार लगेच दिसत नाही. तो प्रवासात उघडा पडतो. उचलताना आणि ठेवताना हात हलका ठेवा.
तुमच्या शेतातून निघाल्यावर पुढे काय होते
हे कळले की शेतावरची काळजी का महत्त्वाची आहे ते लक्षात येते.
- APEDA मान्यताप्राप्त केंद्रात प्री-कूलिंग. आतला गर थंड केला जातो.
- कंटेनर बंद होण्यापूर्वी संपूर्ण मालाची तपासणी.
- 40 फूट रेफर कंटेनरमध्ये 1,540 पेट्या, 13 अंश सेल्सिअसवर.
- न्हावा शेवा बंदरातून जहाजाने आखाती देशांत.
तोडण्यापूर्वी विचारा
प्रत्येक शिपमेंटची माहिती वेगळी असते. काही शंका असेल, तर तोड सुरू करण्यापूर्वी आम्हाला फोन करा किंवा व्हॉट्सॲप करा. नंतर दुरुस्ती करता येत नाही, आधी विचारलेले केव्हाही चांगले.
हे पान छापून घ्या
हीच माहिती एका पानावर. छापता येते आणि व्हॉट्सॲपवर पाठवताही येते.
एका पानाचे माहिती पत्रक (PDF)